Sanvad News जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे गरजेचे - ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अ.ल.देशमुख ; भिलवडी शिक्षण संस्थेत शिक्षक उद्बोधन वर्ग उत्साहात...

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे गरजेचे - ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अ.ल.देशमुख ; भिलवडी शिक्षण संस्थेत शिक्षक उद्बोधन वर्ग उत्साहात...


जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी लागेल, त्यासाठी शिक्षक व विद्यार्थी डिजीटल तंत्रज्ञानाने सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख(पुणे) यांनी केले.भिलवडी शिक्षण संस्था व मराठी डीजी माध्यम सकाळ यांच्या विद्यमाने आयोजित शिक्षक उद्बोधन वर्गात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर ते बोलत होते.


संस्थेच्या बाबासाहेब चितळे सभागृहात शिक्षक उद्बोधन वर्ग संपन्न झाला.अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त जे.बी.चौगुले होते.यापुढे बोलताना डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले की,शिक्षकच समाजाला आकार देऊ शकतो. जो प्रत्येक गोष्टीचा अंतर्मुख होऊन विचार करतो तोच खरा शिक्षक होय.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शिक्षक समुपदेशक भगवान पांडेकर यांनी "कोरोना नंतरचे शिक्षण आणि शिक्षक" या विषयावर विविध प्रात्यक्षिकासह शिक्षकांना मार्गदर्शन केले. कोरोना नंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये मोठा बदल होत आहे.शिक्षकांनी आनंददायी व सकारात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करावे असे मत मांडले.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सकाळ माध्यम समूहाच्या डीजी अॅपचे पुणे प्रतिनिधी दिलीप जाधव यांनी मराठी डिजिटल व्यासपीठा विषयी मार्गदर्शन केले.चालू शैक्षणिक वर्षात मराठी डिजी माध्यम या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगिण विकासासाठी कसा वापर करावा या विषयी
मार्गदर्शन केले.


भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.डॉ.दिपक देशपांडे यांनी पाहुणे परिचय करून दिला.सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी आभार मानले.यावेळी संस्थेचे संचालक जयंत केळकर,प्रसन्न देवी,प्रा.मनिषा पाटील,संभाजी माने,विजय तेली,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने आदींसह संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक उपस्थित होते.




To Top