Sanvad News स्पर्धेच्या युगात गुरुकुलचे विद्यार्थी निश्चितच आयएएस,आयपीएस अधिकारी बनून गुरुकुल संस्थेचे नाव उंचावतील - बाळासाहेब कटारे; गुरुकुल विद्यानिकेतन बागणी येथे सत्कार समारंभ व १० वी निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा.

स्पर्धेच्या युगात गुरुकुलचे विद्यार्थी निश्चितच आयएएस,आयपीएस अधिकारी बनून गुरुकुल संस्थेचे नाव उंचावतील - बाळासाहेब कटारे; गुरुकुल विद्यानिकेतन बागणी येथे सत्कार समारंभ व १० वी निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा.



गुरुकुल करिअर अकॅडमी संस्था बागणी स़ंचलित गुरुकुल विद्यानिकेतन बागणी ता.वाळवा या शाळेतील शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मधील इयत्ता १० च्या वर्गाच्या १ ल्या बॅचचा निरोप समारंभ  कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कटारे, जिल्हा परिषद सांगलीचे माजी वरिष्ठ लिपिक चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.तसेच नूतन बागणी ग्रामपंचायत सरपंच तृप्ती हवलदार, उपसरपंच संतोष घनवट, निवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मण माळी, बागणी केंद्र प्रमुख गोपीनाथ आडके, दानशूर काका पाटील विद्यालय शिगाव मुख्याध्यापिका कचरे मॅडम, भूषण भासर,संदीप हवलदार, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र लोखंडे, उपाध्यक्ष दत्तात्रय अस्वले, संचालक अजय माळी,संजय माने, विजयकुमार कुंबळे, सचिन लोखंडे, सोमनाथ पाटील, वसंत मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता डाळे, उपमुख्याध्यापिका आरती मालेकर, सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थिनीनी स्वागत गीत सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सर्व मान्यवरांचे उपस्थितीत सरस्वती फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता डाळे यांनी प्रास्ताविकामध्ये आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप,संस्थेच्या १२ वर्षाच्या प्रगतीचा आलेखाची माहिती दिली.तसेच सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
  यावेळी दहावीच्या ऐश्वर्या लोखंडे, वैष्णवी पाटील, दिक्षा पाटील,सुफिया पिरजादे या विद्यार्थीनींनी आपली मनोगते व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.लक्ष्मण माळी, गोपीनाथ आडके यांनी आपल्या सुंदर अशा भाषाशैलीने विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता डाळे, उपमुख्याध्यापिका आरती मालेकर,सारिका जाधव यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.या निरोप समारंभात उपस्थितांच्या भाषणांनी सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद यांचे डोळे पाणावले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र लोखंडे म्हणाले की, गुरुकुल संस्था जशी मोठी होत गेली,तशी ही मुले सुद्धा मोठी होत गेली.या विद्यार्थ्यांच्या आशिर्वादानेच संस्था मोठी झाली.हे सांगताना त्यांचे ही डोळे आपसूकच पाणावले.एकूणच वातावरण अतिशय भावूक झाले.
   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब कटारे म्हणाले की,दहावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली.या स्पर्धेच्या युगात गुरुकुलचे विद्यार्थी निश्चितच आयएएस,आयपीएस अधिकारी बनून गुरुकुल संस्थेचे नाव निश्चितच उंचावतील.यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल आवर्जून त्यांनी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांचे सुद्धा विशेष कौतुक केले.. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा देवून भविष्यात या विद्यार्थ्यांचा अधिकारी बनल्यानंतर पुन्हा सत्कार करण्यासाठी येण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
   या कार्यक्रमाचे उत्कृष्ट व अतिशय सुंदर असे नियोजन इयत्ता १० च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या लोखंडे व आभार प्रदर्शन सुफिया पिरजादे या विद्यार्थीनींनी केले.
To Top