पलूस प्रतिनिधी
लाईफ स्टडी सेंटर पलूस यांच्या वतीने दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार व अत्याधुनिक डिजिटल क्लासचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पलूस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण साळुंखे , पलूस नगर परिषदेचे माजी गटनेते सुहासपुदाले,अध्यक्षस्थानीपंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे होते होते.
यावेळी बोलताना पलूस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण साळुंखे म्हणाले आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा महत्वाची असते. गुणवत्ते बरोबरच चांगली माणसे तयार करणे महत्त्वाचे आहे. समाजाची नीतिमत्ता सध्या ढासळत चाललेली आहे . आजच्या तरुणांना सुसंस्काराची गरज आहे. मुलांच्या जीवनाला आकार देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
गटनेते सुहास पुदाले म्हणाले ग्रामीण भागात गुणवत्ता आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर हीसुद्धा मुले स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे.परिश्रमाला इच्छाशक्ती आणि संकल्पशक्तीची जोड दिली पाहिजे असे सांगितले.
अध्यक्ष उदय परांजपे म्हणाले की, डिजिटल माध्यमातून मुलांना चांगले आकलन होते.जीवनात कुठल्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी स्पर्धा ओळखून पुढचे पाऊल उचलण्याची खरी गरज आहे तरच ध्येय आपोआपच तुमच्याजवळ चालत येईल. काळाची गरज ओळखून रोहित चोपडे यांनी सुरू केलेल्या या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक टी.जे. करांडे, नगरसेवक दिलीप जाधव, यशवंत कदम, मोहन सुतार, भास्कर कुंभार ,रमेश कोष्टी, अशोक कुंभार, ए टी पाटील, यांच्या सर्व मान्यवर उपस्थित होते.
स्वागत संचालक प्रा .रोहित चोपडे यांनी केले.सूत्रसंचालन आप्पासाहेब पाटील यांनी आभार बाळासाहेब चोपडे यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी डिजिटल क्लासच्या संचालिका सौ स्नेहल चोपडे, सौ सिंधू चोपडे, मयुरी सुतार प्रज्ञा उनणे, धनश्री साळुंखे, प्रतीक्षा महाजन , वैष्णवी, कुलकर्णी, समीक्षा सूर्यवंशी, सादिया शिकलगार अनुष्का गंजी विद्यार्थी व पालक हजर होते.