Sanvad News हिंदकेसरी गणपतराव आंधळ्कर हायस्कूल ,आंधळी मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

हिंदकेसरी गणपतराव आंधळ्कर हायस्कूल ,आंधळी मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा



आंधळी प्रतिनिधी
हिंदकेसरी गणपतराव आंधळ्कर हायस्कूल ,आंधळी मध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
सकाळच्या सत्रात ताडासन,वृक्षासन पादहस्तासन,त्रिकोणासन,शलभासन,भुजंगासन ,हलासन,पवनमुक्तासन,उष्ट्रासन व प्राणायाम अशी विविध आसने विद्यार्थ्यांनी सादर केली  .क्रिडाशिक्षक श्री माने एम.एन. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेचयोगदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून योगाचार्य श्री अमोल पाटील.पलूस, यानी योग प्रात्यक्षिके करून दाखवली. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री जे.आर.मोहीते सर यानी केले व आभार श्री आर. आर. गायकवाड यानी मानले.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करणेत आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते, त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक  सर्व शिक्षक  - शिक्षिका विद्यार्थी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.


To Top