भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडीयम, प्रायमरी ॲड हायस्कूल भिलवडी मधील कार्यरत शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. प्रसिद्ध वक्ते रणजित संपकाळ (अध्यक्ष सावित्री शिक्षण संस्था मिणचे ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव के.डी.पाटील होते.
यावेळी रणजित संपकाळ यांनी शिक्षण पद्धती, शिक्षकांचे गुण- अवगुण, यश अपयशाचे समीकरण आदी विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सौ. मंजूषा शिंदे यांनी केले.आभार मुख्याध्यापिका कु.विद्या टोणपे यांनी मानले.
यावेळी इंग्लिश मिडीयम स्कूल विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता माने, इंग्लिश प्रायमरी ॲड हायस्कूल विभागाच्या मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे ,सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.