Sanvad News कलाशिक्षक संदिप कदम यांचा राज्यस्तरीय झिंदाबाद पुरस्काराने गौरव..

कलाशिक्षक संदिप कदम यांचा राज्यस्तरीय झिंदाबाद पुरस्काराने गौरव..



सांगली प्रतिनिधी.
 सांगली येथील झिंदाबाद प्रतिष्ठानचे वतीने कला शिक्षक संदीप नारायण कदम यांना राज्यस्तरीय झिंदाबाद आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर ता.पलूस येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
 सांगली येथे नुकताच झिंदाबाद राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे   सांगली मिरज व कुपवाड महापालिका आयुक्त मा. सुनील पवार व  डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली प्राचार्य डी. जी. कणसे, झिंदाबाद प्रतिष्ठान न्यूजचे संपादक तानाजीराजे जाधव व प्रतिष्ठान न्यूजचे व्यवस्थापिका सौ. विद्या तानाजीराजे जाधव आदी प्रमुख उपस्थिती होती.
 कलाशिक्षक संदीप नारायण कदम यांना सांगली मिरज व कुपवाड महापालिका आयुक्त मा. सुनील पवार यांच्या हस्ते आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.संदीप कदम यांनी कलाशिक्षक व्यवसायाबरोबर मुलांना व्यवसायिक कलाशिक्षण देण्यावर भर दिला. तसेच अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. तसेच शिक्षण व्यवसायांबरोबर सामाजिक बांधिलकी या नात्याने समाजामध्ये व ग्रामपंचायतच्या माध्यमातून तरुण वर्गास व्यवसायिक शिक्षण ,स्वच्छता अभियान, आरोग्य विषयक मोहीम राबवणे, चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम राबवून त्यांनी गावात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे नागरिकांनी अभिनंदन केले .



To Top