भिलवडी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या खाजगी प्राथमिक विभागाच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी बाळासाहेब कटारे यांची निवड करण्यात आली.
शिक्षक भवन पुणे येथे राज्य व विभागीय पदाधिकारी यांच्या सहविचार सभा व पदाधिकारी बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे ,राज्यकोषाध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी, विभागाचे प्रमूख सोमनाथ राठोड, कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे, जितेंद्र पवार, कार्यवाह बाळासाहेब चोपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब कटारे हे पलूस येथील श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी कार्यरत आहेत.बाळासाहेब कटारे हे शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारे लढवैय्ये नेतृत्व म्हणून परिचित आहेत.महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून गेली सहा वर्षे त्यांनी खाजगी प्राथमिक शाळा, शिक्षक,शिक्षण संस्था,प्रशासकीय अधिकारी असा समन्वय साधून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत त्यांच्यावर पुणे विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी लढणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सोपविलेल्या जबाबदारीचा स्वीकार करून आपण सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागातील पदाधिकाऱ्यां च्या सहकार्याने उत्कृष्टपणे कामकाज करू असे मनोगत व्यक्त केले.या निवडी बद्दल विविध शाळा,शिक्षण संस्थेच्या वतीने बाळासाहेब कटारे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.