सांगली प्रतिनिधी
खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या फंडाच्या पावत्यांचे लवकरच वितरण करण्यात येणार असल्याची माहिती वेतन पथक अधिक्षक वासुदेव भुसे यांनी दिली.महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षक परिषद सांगलीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे, मिरज तालुका अध्यक्ष अनिल उमराणी, युवराज साठे, करनाळे,अर्चना वाळवेकर या शिष्टमंडळाने नुकतीच वेतनपथक अधिक्षक वासुदेव भुसे साहेब यांची भेट घेतली.फंडाच्या पावत्या शिक्षकांना वेळेत मिळाव्यात याबाबत चर्चा केली.तांत्रिक अडचणींमुळे फंडाच्या पावत्या देण्यास विलंब झाला आहे.२०१८ ते मार्च २०२३ या कालावधीतील पावत्यांचा त्यामध्ये समावेश आहे. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत २०२३ अखेरपर्यंतच्या फंडाची पावती प्रत्येक लाभार्थीना देण्यात येणार आहेत.१ ऑगस्टपासून फंडाच्या पावत्यांचे वाटप सुरु करण्यात येणार असून १५ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र कर्मचाऱ्यांना पावत्या मिळतील.