भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्था पदाधिकारी,शिक्षक व परिसरातील पत्रकारांची पत्रकार परिषद संपन्न झाली.संस्थेचे संचालक गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ.सुनिल वाळवेकर,संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.भिलवडी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असल्याचा आम्हास अभिमान वाटत असून,सेवाभावी वृत्तीने संस्थेने सुरू केलेल्या शैक्षणिक कार्यास*आमच्या शुभेच्छा असून भविष्यात संस्थेच्या विधायक उपक्रमांना योग्य ती प्रसिद्धी देऊ असे मनोगत उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केले.सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी चे मुख्याध्यापक संजय मोरे यांनी स्वागत केले.संस्था सचिव मानसिंग हाके यांनी अमृत महोत्सवानिमित्त संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली.सहसचिव के. डी.पाटील यांनी आभार मानले.
पत्रकार प्रदीप माने,दिपक पाटील,अभिजीत रांजणे,घनश्याम मोरे,भाऊसाहेब रुपटक्के,संदिप नाझरे, जमीर संदे,सचिन टकले,रोहित रोकडे, समीर कुलकर्णी,पंकज गाडे,शरद जाधव,प्रमोद काकडे आदींसह विविध प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,प्रा.एम.आर.पाटील, उपमुख्याध्यापक विजयतेली, पर्यवेक्षक विनोद सावंत,मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी आदी उपस्थित होते.