Sanvad News पलूस-कडेगावची चौफेर प्रगती हेच माझे ध्येय - आ.डॉ.विश्वजीत कदम; खंडोबाचीवाडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

पलूस-कडेगावची चौफेर प्रगती हेच माझे ध्येय - आ.डॉ.विश्वजीत कदम; खंडोबाचीवाडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात


पलूस-कडेगावची चौफेर प्रगती हेच माझे ध्येय - आ.डॉ.विश्वजीत कदम

खंडोबाचीवाडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

भिलवडी प्रतिनिधी :

पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सक्षम असल्याची ग्वाही आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी दिली.खंडोबाचीवाडी ता.पलूस येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

 माजी मंत्री स्व.डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवली. साहेबांचा आदर्श जपत मी जनसामान्यांच्या कल्याणासाठी सदैव काम करत आहे. मतदारसंघाचा विकासरथ पुढे नेण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक आपल्याला भरघोस मतांनी जिंकायची आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.

 मेळाव्यास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, भिलवडीचे प्रमुख नेते राजूदादा पाटील, बाळासाहेब मोहिते, संताजी जाधव, कुमार पाटील, माणिक माने, नंदकुमार कदम, अमोल पाटील, प्रल्हाद गडदे यांच्यासह भिलवडी जिल्हा परिषद गटातील भिलवडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, धनगांव, बुरूंगवाडी, भिलवडी स्टेशन, सुखवाडी, चोपडेवाडी, खटाव, वसगडे, ब्रम्हनाळ या गावचे सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top