Sanvad News औदुंबर येथे श्री दत्त जयंती निमित्त एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न; चार हजारांवर साधकांचा सहभाग

औदुंबर येथे श्री दत्त जयंती निमित्त एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न; चार हजारांवर साधकांचा सहभाग

 औदुंबर येथे श्री दत्त जयंती निमित्त एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न; चार हजारांवर  साधकांचा सहभाग

अंकलखोप प्रतिनिधी :

श्री दत्तजयंती उत्सवाला प्रारंभ आज पासुन सुरू झाला आहे. आज पहिल्या दिवशी श्री गुरू चरित्राचे पारायण आयोजन करण्यात आले होते. यात ४००० साधकांनी सहभाग घेतला होता. गुरुवारी सकाळी ८.०० वाजता. श्री स्वामी समर्थांच्या भूपाळी आरती नंतर  श्री गुरूचरित्राचे संकल्प युक्त सामुदायिक वाचन  संपन्न झाले.  श्री क्षेत्र औदुंबर येथे सांगली  जिल्ह्यातील तसेच जिल्ह्या बाहेरील अनेक साधक उपस्थित होते. अनेेक सेवेकरी यांनी गरू चरित्र पारायण ही सेवा गुरू चरणी समर्पित केली. श्री दत्त सेवा भावी मंडळ ( ट्रस्ट), यांनी नियोजन केले. तसेच श्री दत्त जन्मोत्सवाच्या दुस-या दिवशी अर्थात शुक्रवार दि. १३ रोजी संग्रहमख श्री दत्त योग, सह विविध धार्मिक कार्यक्रम व होम हवन होणार आहे. 

.

To Top