पलूस येथे पवन अर्बन सोसायटीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात
पलूस प्रतिनिधी:पलूस येथील पवन अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी चे प्रकाशन मानसिंग बँकेचे चेअरमन श्री.सुधीर जाधव (भैया) श्री सुनील नलवडे माजी सभापती पलूस कृषी उत्पन्न बाजार समिती पलूस तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.अतुल अनुसे ,उपाध्यक्ष श्री.राहुल माने यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी श्री सुधीर (भैय्या)जाधव यांनी पवन अर्बन ऑफ क्रेडिट सोसायटीच्या उत्तम कार्याचे व प्रगतीचे कौतुक केले तसेच संस्थेमध्ये चालू असलेल्या मोबाईल बँकिंग सुविधा एस एम एस सुविधा तसेच मुदत ठेवींची माहिती घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी ॲड.नितीन पाटील ॲड.सोमनाथ पाटील ॲड.अजितसिंह जाधव ॲड.सागर बनसोडे, ॲड.रियाज मुलाणी येस बँकेचे मॅनेजर श्री.भरत कदम, श्री.राहुल शिंदे पलूस शहरातील उद्योजक श्री.विक्रम फरताडे श्री.सतीश जाधव श्री.किशोर जाधव , प्रगतिशील शेतकरी श्री.विनायक गावडे , श्री.रोहित सावंत श्री.विलास माने आणि संस्थेचे संचालक श्री.अजित येडगे ,श्री.गणपती पाटील, सौ.रेश्मा अनुसे सर्वसांचालक मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.