जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे नेतृत्व-आमदार डॉ.विश्वजीत कदम
महापूर येऊ द्या... कोरोना महामारी येऊ द्या... सर्वसामान्यांच्या लेकरांच्या हाताला रोजगाराची संधी द्यायची असे दे की,परस्थिती शिक्षणाच्या आड येत असणाऱ्या पोरांची फी सवलती,माफी द्यायची असू दे की एखाद्या व्यक्तीस अत्यावश्यक अशी आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायची असो, संकट कोणतही असल तरी मैं हूं ना म्हणत सैदेव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या डॉ.पतंगराव कदम यांच्या विचारांचा संस्काराचा वारसा त्यांच्या सुपुत्राने अर्थात आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी समर्थपणे चालविला आहे.संकटापूर्वी आणि संकटा नंतर सैदेव जनतेच्या सोबत ठाम राहून त्यांनी तुम्ही विश्व माझे मी तुमचा विश्वजीत म्हणत स्वतःची अशी छाप पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघ नव्हे तर महाराष्ट्र नि देशाच्या राजकारणात निर्माण केली आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे पलूस-कडेगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून माजी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम हे कर्तृत्वसंपन्न नेतृत्व म्हणून राज्यात आणि देशात नावलौकिक मिळवीत आहेत. डॉ. पतंगराव कदम यांचा वारसा ते भक्कमपणे चालवीत आहेत. राज्याच्या विधिमंडळातील एक तरुण आणि गतिमान पद्धतीने समाजहिताची कामे करणारे आमदार म्हणून विश्वजीत कदम यांचे नाव आग्रक्रमाने घ्यावे लागेल. विश्वजीत कदम यांच्यात राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाची क्षमता असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी आणि दिग्गज नेत्यांनीही वारंवार सांगितले आहे.
विश्वजीत कदम यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाची वेगळी छाप टाकली आहे.राहुल गांधींचे खंदे शिलेदार म्हणून कार्यरत आहेत.युवक काँग्रेसमध्ये काम करताना विश्वजीत कदम यांचे परिश्रम पाहून राहूल गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय जबाबदारी देण्याचे ठरविले होते. कारण ती गुणवत्ता आणि परिश्रम घेण्याची क्षमता विश्वजीत कदम यांच्यात आहे, हे राहुल गांधी यांना माहिती आहे; मात्र विश्वजीत कदम यांनी स्वता राहुल गांधी यांना भेटून मला माझ्या मतदारसंघात, पलूस-कडेगावच्या मातीतील जनतेची सेवा करण्यासाठी राज्यात काम करायचे आहे,असे आवर्जून सांगितले. ९ मार्च २०१८ रोजी आदरणीय डॉ. पतंगराव कदम यांचे निधन झाले.यामुळे रिक्त झालेल्या जागी विश्वजीत कदम पलूस-कडेगात मतदारसंघातून बिनविरोध आमदार झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मताधिक्याने विजयी झाले. राज्यात शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी अशा महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात विश्वजीत कदम यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती.२०२४ विधानसभा निवडणूकीत दिग्गज नेतृत्वाना जनतेने घरात बसविल मात्र डॉ.विश्वजीत कदम बहुमताने विजयी झाले.त्यांच्या विजयाची हॅटट्रिक म्हणजे जनतेन त्यांच्यावर आणि त्यांनी निर्माण केलेल्या विकासाभिमुख कामकाजावर दाखविलेला विश्वास होय.
जी मिळेल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याची क्षमता विश्वजीत कदम यांच्यात आहे. ती त्यांनी कामातून दाखवून दिली. डॉ.पतंगराव कदम साहेबांचा वारसा विश्वजीत कदम खांबीरपणे चालवीत त्यांची वैचारिक,राजकीय आणि कार्यकर्तृत्वाची परंपरा पुढे नेण्याचे काम समर्थपणे पार पाडत आहेत. वडिलांप्रमाणेच त्यांच्याकडे विधायक व व्यापक दृष्टी आहे. जनतेची मने जिंकून घेणारा स्वभाव आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातली सहजता, विनम्रता,सुसंस्कृतपणा जनतेला भावणारा आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वात सुपरफास्ट मंत्री म्हणून विश्वजीत कदम यांचा दबदबा होता.डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेली
भारती विद्यापीठ ही संस्था देशातील एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या कारभाराचा व्याप ते गेल्या अनेक वर्षापासून समर्थपणे संभाळत आहेत. राहुल गांधींना अभिप्रेत असलेले सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम मंत्री म्हणून सक्षमपणे केलेच,शिवाय काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पक्षसंघटन मजबूत करण्याचे कामही सातत्याने करीत आहेत.
नेतृत्व एका दिवसात घडत नाही, ते घडवावे लागते. ते घडविणारी जनता पलूस-कडेगावमध्ये आहे. यामुळे विश्वजीत कदम आज ताकदीने विधानसभेत काम करीत आहेत,एखाद्या राजकीय नेत्याने संकटकाळात जनतेला मदत कशी करावी, धीर कसा द्यावा, याचे आदर्श उदाहरण डॉ. विश्वजीत कदम यांनी आपल्या कामातून घालून दिले. महापुराच्या संकटकाळात विश्वजीत कदम यांनी कृष्णाकाठच्या लोकांना केलेली मदत,कोरोनाच्या संकटात त्यांनी व्यक्तिगत पातळीवरील मदत आणि भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून दिलेली रुग्णसेवा,लॉकडाऊनच्या काळात त्यांनी जनतेशी संवाद साधून दिलेला धीर हे सगळे संकट काळात एखाद्या नेत्यानं जनतेला मदत कशी करावी याचे आदर्श उदाहरण होय.सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळीशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आमदार म्हणून काम करीत असताना, सर्वसमावेशक विकास करणे, जनतेच्या समस्यांचा निर्धाराने मुकाबला करणे, हेच मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून विश्वजीत कदम कार्यरत आहेत. त्यांच्या अंगी असलेला समजूतदारपणा, सुसंस्कृत आणि निगवर्ती स्वभाव सामान्य जनतेला भावतो काँग्रेसला आणि पलूस- कडेगाव मतदारसंघाला डॉ. विश्वजीत कदम यांच्या रुपाने एक सक्षम आणि कुशल नेतृत्व लाभले आहे. त्यांची कार्यशैली पाहताच डॉ. पतंगराव कदम यांची प्राकर्षाने आठवण होते. आमदार म्हणून विश्वजीत कदम हे सक्षमपणे जबाबदारी सांभाळत पलूस-कडेगाव मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर सातल्याने अग्रेसर ठेवतील असा विश्वास आहे.
विश्वजीत कदम यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. आता प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांचे नेतृत्व भक्कम आहे. त्यामुळे काँग्रेसमधील शक्तिशाली संघटक म्हणून त्यांची राज्यभरात चर्चा आहे. इतकेच नव्हे, तर त्यांची वैचारिक बैठकही पक्की आहे. कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत ते विचलित होत नाहीत. तोल जराही ढळू देत नाहीत. वस्तुस्थिती समजून घेऊन, परिस्थितीचा समतोल विचार, सखोल अभ्यास करून निर्णय घेतात. त्या निर्णयात 'दृढता' असते. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तो योग्य असल्याचे पटवून देण्याची क्षमता, कौशल्य त्यांच्याकडे आहे.डॉ.पतंगराव कदम यांचा वारसा, भारती विद्यपीठ, भारती बैंक, भारती हॉस्पिटल, सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सागरेश्वर व कृष्णा-वेरळा सहकारी सूतगिरणी असे सहकारातील संस्थांचे विणलेले जाळे.काँग्रेसचे कार्याध्यक्षपद, आमदारपद,इतकी ताकद जवळ असूनही विश्वजीत कदम यांचा विनम्रपणा लोकांना भावणारा आहे. हीच त्यांची मोठी ताकद आहे. चांगलं काम करणारा एक तरुण नेता म्हणून ओळख निर्माण झालेल्या विश्वजीत कदम यांनी यापूर्वीच युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून चांगली बांधणी केली आहे. एक आश्वासक चेहरा म्हणून तमाम महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय.
@ शरद जाधव 9890641670