Sanvad News ई स्कूल टाईम्स - शैक्षणिक व्यासपीठावर दमदार आगमन

ई स्कूल टाईम्स - शैक्षणिक व्यासपीठावर दमदार आगमन

ई स्कूल टाईम्स - शैक्षणिक व्यासपीठावर दमदार आगमन


आज दिवाळी पाडवा..साडेतीन मुहूर्तातील एक शुभ दिवस..दीपोत्सवाच्या साक्षीने काही तरी नवे निर्माण करण्याचा दिवस..या दिनाचे औचित्य साधून आम्ही ई-स्कूल टाईम्स या डिजीटल व्यासपीठाची निर्मिती करून शिक्षण क्षेत्राच्या सेवेसाठी चिमुकले पाऊल टाकीत आहोत.

यामध्ये महाराष्ट्रातील विविध शिक्षण संस्था,शाळा राबवित असलेले विविध शालेय उपक्रम,उपक्रमशील गुरुजन,शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविले जात असणारे  उपक्रम, विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन,उल्लेखनीय गोष्टींची प्रसिद्धी केली जाणार आहे.
हे व्यासपीठ केवळ प्रसिद्धी पुरते असणार नाही तर शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण करून या चळवळीला बळकटी प्राप्त करून संवादाचा सेतू बळकट करणे हा आहे.वेळोवेळी आपल्या सूचना,मते विचारात घेऊन आम्ही आमच्या कार्यप्रणालीची दिशा ही ठरवू..तोपर्यंत या उपक्रमास आपले आशीर्वाद देऊन सहकार्य लाभावे ही नम्र विनंती..


आपले नम्र
टीम ई स्कूल टाईम्स
To Top