देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाड ता. मिरज यांच्यावतीने वैशाली नितेंद्र जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सांगली साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल (दादा ) पाटील यांच्या हस्ते व माजीआमदार प्रा.शरद पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकाना हा पुरस्कार देण्यात येतो. जि.प.शाळा बेडग नंबर१ या शाळेतील शिक्षिका वैशाली जाधव यांनी तालुका स्तरीय आणि जिल्हा स्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मीती स्पर्धा आणि विज्ञान साहित्य निर्मीती स्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.त्यांच्या विविध शैक्षणिक व सामाजिक कामांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते सर,महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष नितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.