रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्यावतीने खंडोबाचीवाडी ता.पलूस गावचे सुपुत्र महादेव माने यांना नेशन बिल्डर अँवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील व पलूस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महादेव माने हे जि.प.शाळा नेहरूनगर ता. तासगाव येथे शिक्षकपदी कार्यरत आहेत.एकविद्यार्थीप्रिय,उपक्रमशील,
आदर्श शिक्षक,आघाडीचा संवेदनशील कथाकार म्हणून ते परिचित आहेत.सांगली जिल्ह्यातील पूर स्थितीत एक सजग नागरिक म्हणून अत्यंत वेगळे काम करून सामाजिक भान जिवंत ठेऊन त्यांनी अनमोल असे काम केले आहे.त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन रोटरी क्लबने त्यांचा सन्मान केला आहे.
शाल,श्रीफळ,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.महादेव माने व सौ.सविता माने यांनी मान्यवरांच्या हस्ते सपत्निक हा पुरस्कार स्विकारला.
यावेळी सुरेश देशमुख,धोंडीराम शिंदे, राहुल मोहिते आदींसह मान्यवर उपस्थित होते.खंडोबाचीवाडी व परीसरातील नागरिक व शिक्षण व साहित्य परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी सुरेश देशमुख,धोंडीराम शिंदे, राहुल मोहिते आदींसह मान्यवर उपस्थित होते.खंडोबाचीवाडी व परीसरातील नागरिक व शिक्षण व साहित्य परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.