पलूस येथील पंडीत विष्णू दिगंबर पलूस्कर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्यांची हैदराबाद येथेऐतिहासिक अभ्यास दौऱ्यासाठी सहल गेली.एस.टी.,ट्रॅव्हल्स किंवा रेल्वे नव्हे तर चक्क विमानातून सहल काढून विद्यार्थ्यांना हवाई सफरीचा रोमांचकारी अनुभव दिला.
पंडीत विष्णू दिगंबर पलूसकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या रौप्य मोहोत्सवी वर्षानिमित्त त्यानिमित्ताने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी ,ऐतिहासिक गोवळकोंडा किल्ला चार मिनार ,सालारजंग म्युझीअम,स्नो वर्ल्ड,लुंबिनीपार्क येथील गार्डन लेसर शो, बिर्ला मंदिर तसेच एनटीआर गार्डन तसेच अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन माहिती घेतली. परतीच्या प्रवासामध्ये हैदराबाद ते कोल्हापूर असा इंडीगो एअर कंपनीच्या विमानाने विद्यार्थ्यांनी विमान प्रवास केला. सुमारे अडीच हजार फुटावरून स्वताला जाणारे विमान पाहून विद्यार्थी रोमांचित झाले होते. एक अवर्णनीय आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता.प्रत्यक्षात ढगात गेल्याचा अनुभव त्यांनी घेतला.तसेच विमान प्रवास करण्यासाठी सिक्युरीटी चेकिंग,काउंटरवर तिकिट काढणे,मोठया सामानाच्या बॅगा लगेज विमानात ठेवणे,बोर्डींग करतानाची प्रक्रिया तसेच विमाननतळावर गेल्यावर बसमधून विमानापर्यंत जाणे आदी प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवाद्वारे समजून घेतल्या.
कोल्हापूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर वेगळा उत्साह आनंद जोश दिसून येत होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये मुख्याध्यापक टी.जे.करांडे, सहल विभागप्रमुख बाळासाहेब चोपडे, बी. एन. पोतदार,सौ. पी. यु.बिराज पालक मोहन सुतार,सौ.रूपा सुतार व २०विद्यार्थी सहभागी झाले. या ऐतिहासिक दौऱ्याचे आयोजन करण्यासाठी पंडीत विष्णू दिगंबर पलूस्कर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे साहेब यांच्यासह सचिव जयंतीलाल शहा,उपाध्यक्ष सुनील रावळ, संचालक विश्वास रावळ यांचेही मार्गदर्शन मिळाले.
इतक्या लहान वयात आपणास हवाई सफरीचा आनंद दिल्याबाद्दल सहभागी विद्यार्थीवर्गाने शाळा व संस्थेस धन्यवाद दिले.
