अंतरा उबाळे देशात दुसरी; ५१ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल
रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांनी आयोजित केलेल्या रंगोत्सव स्पर्धेत विटा जि.सांगली येथील सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत ५१ गोल्ड मेडल मिळवून इतिहास निर्माण केला. यामध्ये प्रशालेची विद्यार्थिनी अंतरा महेश उबाळे हीने देशात द्वितीय क्रमांक मिळवत मानाचा चांदीचा चषक पटकाविला. प्रशालेची विद्यार्थिनी पल्लवी जनार्दन जानकर हिने आर्ट मेरिटमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सन्मानाची ट्रॉफी प्राप्त केली. याशिवाय प्रशालेच्या शिशुमंदिरातील गौसिया उमेर शिकलगार व कांचन प्रदीप जगदाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत लंच बॉक्स गिफ्ट सेट्स सहित गोल्ड मेडल पटकावले. प्रशालेतील विद्यार्थी हर्षवर्धन मेटकरी याने कोलाज चित्र व कार्टून मेकिंग मध्ये दोन गोल्ड मेडल पटकावत आपला ठसा उमटविला आहे.
प्रशालेतील श्रीवर्धन मेटकरी, वरद पवार, अनुज लाटणे ,श्रेयस ननवरे, राजदीप खर्जे, वसीम बारस्कर ,श्रेया महाडिक, दिगंबर सुकटे ,तनुश्री धर्माधिकारी, तनवी भिंगारदेवे, अर्पिता गोसावी, शरयू मेटकरी,तपस्वी खर्जे, हर्ष जानकर, मृणाली धर्माधिकारी, तृप्ती सावंत, अस्मिता पवार ,प्राची मोरे, सलोनी जाधव ,ऐश्वर्या जानकर , तेजस वेळापूरकर यांसह अनेक मुलांनी गोल्ड मेडल मिळवले आहे.स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रंगोत्सव तर्फे सर्टिफिकेट देण्यात आले.प्रशालेने स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर व प्रशालेतील कला शिक्षिका पूजा जाधव यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.