भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरूवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे माजी विद्यार्थी,राष्ट्रीय खेळाडू व पोलीस सेवेत कार्यरत असलेले शौकत इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी हाँलीबाँल खेळाडू अक्षदा वावरे हिने खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. खेळामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. मनाचा धाडसीपणा वाढतो.शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.असे प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एम मन्वाचार या होत्या. उत्तम आरोग्यासाठी खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मन प्रसन्न, शांत राहण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक संभाजी माने, बाबासाहेब चितळे महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख महेश पाटील, खाजगी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख जी. एस साळुंखे, आर. आर हिरूगडे, के. डी पाटील, प्रमोद काकडे, के. आर पाटील, ,एस. ए उंडे, रूपेश कर्पे, बी. बी कोळी, सौ. जी. एम गावित, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख सी.एस.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल भोये यांनी तर आभार निलेश कुडाळकर यांनी मानले.