
मे.बी.जी.चितळे डेअरीचे पार्टनर व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक उद्योगपती गिरीश चितळे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस आपल्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त १ लाख ४७ हजार रुपये देणगी दिली.
उद्योगपती काकासाहेब चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी या देणगीचा स्विकार केला.२४ ऑक्टोबर रोजी असणाऱ्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाढदिवसाच्या अंकामध्ये एक लाख रुपये वाढवून प्रतिवर्षी देणगी देण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली आहे.भिलवडी शिक्षण संस्थेअंतर्गत विविध शाखामध्ये शैक्षणिक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा वापरला केला जातो.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त नानासाहेब चितळे, संचालक डी. के.किणीकर,डॉ.सुनिल वाळवेकर,आर.डी.पाटील,संजय कदम,संस्था सचिव संजय कुलकर्णी,मानसिंग हाके,के.डी.पाटील,सौ.मनिषा पाटील,सौ.शुभांगी मन्वाचर,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे आदी उपस्थित होते.