दिल्ली येथील हंसराज विश्वविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदी अधिवेशनसंपन्न झाले.त्यामध्ये देशातील सुमारे११६८लेखक,कवी व हिंदी-शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या नियोजनात उत्कृष्ठ योगदान दिलेबद्दल राज्य समन्वयक श्री कैलास जाधव,सांगली जिल्हा समन्वयकजयवंत रामचंद्र मोहिते व राजूदास पवार यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय,राज्यपाल मृदुला सिन्हा,डाॅ.सी.पी.ठाकूर,नंदकिशोर पांडे,जयकांत मिश्रा ,शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचेहस्ते सन्मानचिह्न देऊन गौरविण्यात आले.तसेच .परिसंवाद,भाषण, काव्यवाचन इत्यादी कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभागाबद्दल सांगलीतील सौ.संजीवनी मोहिते,किशोर वाघमारे,आप्पासो पाटील,डी.के.कांबळे,ए.वाय.पाटील,सीमा सावंत,अंजली सुतार,पंडीत पाटील,सुजाता पाटील,उदयकुमार गवळी,विनोद पाटील , शरद पाटील, एस.के.माने ,प्रमोद कांबळे व समन्वयक श्री जयवंत मोहिते या १५ शिक्षकांचा सन्मानचिह्वन व प्रशस्तिपत्र देऊन भाषा सहोदरी हिंदी या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.