Sanvad News "सुनो घंटी बजी स्कूल की..चलो स्कूल तुमको पुकारे.."

"सुनो घंटी बजी स्कूल की..चलो स्कूल तुमको पुकारे.."


"सुनो घंटी बजी स्कूल की..चलो स्कूल तुमको पुकारे.."

          बालमित्रांनो,दिवाळीची सुट्टी संपली..सोमवारी सर्वांची शाळा सुरू होणार..शाळेचे पहिले सत्र संपले.खरे तर महापूर आणि अतिवृष्टीने राज्यभर हाहाकार उडवून दिला.शाळेला जाता न आल्याने शाळेला दांड्या पडायच्या...तर पूरग्रस्त गावातील शाळांना दहा बारा दिवस आपत्कालीन सुट्ट्या.गणपती,नवरात्र,विधानसभा निवडणूकीची धामधूम,त्यातच प्रथम सत्र परीक्षेची लगबग..विद्यार्थी,शिक्षक आणि पालक सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागली.पहिले सत्र तर भुर्रर्रकन संपून गेले.
                 सोमवारी शाळेची घंटा वाजेल नि दुसऱ्या सत्राचा श्रीगणेशा होईल.मग उन्हाळ्याच्या सुट्टी पर्यंत फुल्ल शेड्युल्ड.वार्षिक क्रीडा सामने..विविध शालेय व शाळाबाह्य स्पर्धा..उपक्रम...वार्षिक स्नेहसंमेलन..पारितोषिक वितरण कार्यक्रम..स्पर्धा परीक्षांची जय्यत तयारी..जादा तास..एक ना दोन..दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या पोरांच्या कष्टाबद्दल तर काही विचारूचं नका..दिवाळी सुट्टीनंतर येणाऱ्या दुसऱ्या सत्राचा कालावधी दिसायला मोठा पण कामकाजाचा भार सर्वाधिक..शाळा चालू झाली की पहिल्या सत्राचा निकल मिळेल. गुरुजन व पालक मंडळी त्यावर पुढील सत्राचे नियोजन करतील व तुम्हाला आणखी जादा पळायला लावतील.तुम्ही तुमचे आत्मचिंतन करा नि पुन्हा एकदा झपाटून अभ्यासाला लागा.तुम्हा सर्वांना शाळेच्या दुसऱ्या सत्रासाठी शुभेच्छा..!
                  दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर eschooltimes या नावाने डिजिटल शैक्षणिक व्यासपीठाची निर्मिती केली आहे.या शैक्षणिक व्यासपीठास आपणाकडून सलामीलाच भरभरून प्रतिसाद मिळाला..आम्ही आपल्या ऋणात आहोत.तुमच्या आमच्या संवादाची वीण आणखी घट्ट करण्यासाठी आम्ही एक उपक्रम घेऊन आपणापर्यंत येत आहोत.तुम्ही दिवाळी सुट्टीत नक्कीच धमाल केली असेल.या सर्व आठवणी किंवा अनुभव आपण मोबाईल वर कमीतकमी अडीचशे ते तिनशे शब्दांत टाईप करायच्या.तुमचा एक आयडेंटी आकारातील फोटो,तुमचे पूर्ण नाव,शाळेचा पत्ता असा सर्व मजकूर info.eschooltimes@gmail.com या ईमेल वर पाठवा.निवडक अनुभव eschooltimesवरून प्रसिद्ध करू..
                 तुमच्या शाळेतील विविध उपक्रम,कार्यक्रम, यांना आपण प्रसिद्धी तर देणार आहोतच.बालमित्रांनो आठवड्याच्या दर रविवारी नवनवीन विषय घेवून मी तुमच्या भेटीला येणार आहेच...तोपर्यंत शक्य झालं तर youtube वरील हे गाणे ऐकाच...

"सुनो घंटी बजी स्कूल की.. चलो स्कूल तुमको पुकारे.."


                                                                  तुमचाच..
                                                                  आनंद...!




To Top