Sanvad News बालगंधर्व विद्यालय नागठाणे मध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न..

बालगंधर्व विद्यालय नागठाणे मध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न..


   बालगंधर्व विद्यालय नागठाणे मध्ये सन १९९९-२००० या शैक्षणिक वर्षांमध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थी वर्गाचा स्नेह मेळावा संपन्न झाला.विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एन.माने यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंगल कार्यालय औदुंबर येथे  विविध कार्यक्रमांनी स्नेहमेळावा पार पडला.  
           आमच्या जडणघडणीत बालगंधर्व विद्यालयाच्या सिंहाचा वाटा असून जीवनामध्ये योग्य दिशा दाखवण्याचे काम या विद्यालयातील सर्व शिक्षकांनी केले अशी मनोगते विद्यार्थ्यांनी व्यक्त करित आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगून आपला जीवनपट उलघडला. विविध विद्यार्थी व शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या वेळी अध्यापन करत असणाऱ्या,तसेच सध्या कार्यरत असणाऱ्या  शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
           अधिकराव जाधव, डॉ. सुनील चव्हाण,प्रा.संदीप अडिसरे, दशरथ फार्णे, धनंजय कुंभार, प्रसाद पाटील,संतोष माने, अमोल पाटील, सुनील उंबरे ,विजय गुरव, महेश कोळी,सुनील पाटील ,संतोष पाटील नितीन सूर्यवंशी, सचिन टोपे, विशाल कांबळे, या सर्व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

To Top