Sanvad News आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत इस्लामपूरच्या कलाविश्व नृत्यसंस्कार अकादमीचे वर्चस्व..

आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत इस्लामपूरच्या कलाविश्व नृत्यसंस्कार अकादमीचे वर्चस्व..

मलेशियामध्ये स्पर्धा गाजविली; ४सुवर्ण,
४ रौप्य व २ कांस्यपदकांची कमाई.   

 

अखिल लोककला कल्चरल ऑर्गनाईझेशन पुणे यांच्या वतीने मलेशिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत इस्लामपूर येथील कलाविश्व नृत्यसंस्कार अकादमीच्या कलाकारांनी भारतीय नृत्यसंस्कृतीचे उत्कृष्ट सादरीकरण करत दुसऱ्यांदा आपले वर्चस्व सिद्ध केले.५ नोव्हेंबर रोजी कुलालांपूर येथील हॉटेल हॉलिडे व्हिलाच्या भव्य थिएटर मध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या.  

           कलाविश्व नृत्यसंस्कार अकादमीचे कलाकार विविध १० नृत्य प्रकारात सहभागी झाले.त्यामध्ये ४ नृत्यास सुवर्ण पदक,४ नृत्यास रौप्य पदक तर२ नृत्यास कास्य पदक प्राप्त झाले आहे.अकादमीचे क्रिएटिव्ह हेड, नृत्यदिग्दर्शक हेमंत रकटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हर उज्वल यश प्राप्त करून इस्लामपूर आणि परिसराचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविला.
वैयक्तिक नृत्य प्रकारात-
वेदिका माळी....(सेमि क्लासिकल भरतनाट्यम).
लहान गट - सुवर्ण पदक..
रिया सलगर...(लोककला लावणी).
मोठा गट - सुवर्ण पदक.
स्वागता माळी...(सेमि क्लासिकल कथक).
खुला गट - कास्य पदक
हेमंत रकटे व् रचना पाटील...(मॉडर्न नृत्य).
दुहेरी खुला गट- सुवर्ण पदक.
ऋषिराज जाधव..(मॉडर्न नृत्य).
मोठा गट - रौप्य पदक.
वेदिका मधाळे. (भरतनाट्यम).
मोठा गट - रौप्य पदक.
तनिषा कदम.(लोककला देवीचा जागर नृत्य).
लहान गट- कास्य पदक.
ग्रुप डान्स.
कलाविश्व नृत्यसंस्कार अकादमी.(सेमी क्लासिकल भरतनाट्यम) लहान गट-.रौप्य पदक..
कलाविश्व नृत्यसंस्कार अकादमी.(लोकनृत्य)
मोठा गट-सवर्ण पदक.
नवदुर्गा डान्स ग्रुप.पालकवर्ग (लोककला होळीनृत्य) मोठा गट- रौप्य पदक
सर्व सहभागी विद्यार्थी व पालकवर्गाचे या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

To Top