नागठाणे ( ता. पलूस ) येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयाचा विद्यार्थी बालचित्रकार ओंकार विजय यादव (इयत्ता ९ वी) एबीपी.माझा या वाहिनीवर दिसणार आहे.
१४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त एबीपी माझा या वाहिनीने आयोजित केलेल्या बालमैफलीत बालगीते व संगीतावर आधारित चित्रे रेखाटण्यासाठी निवड झाली.
एबीपी माझाच्या वरळी,मुंबई येथील मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात ओंकार यादव याने वेगवेगळ्या विषयावरील गीतांवर चित्रे रेखाटून उपस्थितांची मने जिंकली. हा कार्यक्रम बालदिनी १४ नोव्हेंबरला प्रसारित होणार आहे.यावेळी एबीपी माझाचे विनोद घाटगे,प्रज्ञा पोवळे , कलाशिक्षक जितेंद्र बनसोडे व अधिकारी उपस्थित होते. ओंकारला मुख्याध्यापक डी. एन.माने,दीपक कारंडे,अधिक जाधव,संजय झेंडे, विजय माने आदींचे मार्गदर्शन लाभले.