Sanvad News खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावाबाबत शिक्षणाधिका-यांना निवेदन

खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावाबाबत शिक्षणाधिका-यांना निवेदन

प्रस्ताव तात्काळ निकालात काढू-शिक्षणाधिकारी

महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावाबाबत सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांना निवेदन देण्यात आले.

                 सांगली जिल्हयातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वरिष्ठ वेतनश्रेणी१o,२०,३० बाबत पात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मागणी करणे,सांगली जिल्हयातील एकूण शंभर टक्के अनुदानित १५२,अंशता अनुदानीत२४ व विनाअनुदानीत २१ शाळा आहेत.या सर्व खाजगी प्राथमिक शाळामधून सुमारे ८४० कर्मचारी कार्यरत आहेत.या सर्व शिक्षकांची विनाअनुदानित सेवा धरून १० वर्षे,२oवर्षे, ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.अशा शाळा व शिक्षण संस्था प्रमुखांनी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव कार्यालयात १५ दिवसात सादर करण्याबाबत आदेश निघावा. अशी मागणी करण्यात आली.तसेच शाळांच्या विविध प्रलंबित कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
      यावेळी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी सर्व प्रस्ताव येत्या चार दिवसांत निकालात काढू असे आश्वासन दिले.
          यावेळी खाजगी प्राथमिक विभागाचे अधीक्षक संजय राऊत,लिपीक गुरू कांबळे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब कटारे, कार्याध्यक्ष राजाराम व्हनखंडे,जिल्हा मार्गदर्शक चंद्रकांत चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष नितेंद्र जाधव,मनपा शहर अध्यक्ष उदयसिंह भोसले, कोषाध्यक्ष प्रविण देसाई, शिक्षकेत्तर महिला आघाडीच्या प्रमुख अर्चना वाळवेकर,गिरिष पाटील,जाधव मॅडम,कुंभार मॅडम, मुल्ला मॅडम आदी उपस्थित होते.
To Top