Sanvad News विभागीय कुडो स्पर्धेत श्रुती पाटीलचे यश.

विभागीय कुडो स्पर्धेत श्रुती पाटीलचे यश.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी व हायस्कूल भिलवडी ची विद्यार्थिनी कु.श्रुती शशिकांत पाटील हिने कोल्हापूर विभागीय शालेय कुडो स्पर्धेचे विजेतेप प्राप्त केले.
              क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर कुडो असोसिएशन ऑफ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव, ता. पन्हाळा येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.श्रुती येळावी गावची सुकन्या असून १४ वर्ष वयोगटातील कुडो स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त केले आहे. बुलढाणा येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी तिची  निवड झाली आहे.या यशाबद्दल तिचे भिलवडी शिक्षण संस्था व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

To Top