Sanvad News पारंपारिक खेळातून आनंदाची लयलूट;क्षितिज प्रायमरी स्कूलमध्ये बालदिन

पारंपारिक खेळातून आनंदाची लयलूट;क्षितिज प्रायमरी स्कूलमध्ये बालदिन

      सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या बुरुंगवाडी ता.पलूस येथील क्षितिज प्रायमरी व निवासी संकुलातील विद्यार्थ्यांनी  लोप पावत चालत असलेले पारंपारिक खेळ खेळून बालदिन साजरा केला.

                चिमुकल्या बालकांच्या हस्ते  पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पारंपारिक खेळप्रकाराविषयी मुख्याध्यापिका  सौ.दिपाली जाधव यांनी माहिती सांगितली. सौ.शुभांगी पाटील यांनी पं.नेहरू यांच्याविषयी माहिती सांगितली.संस्थेचे अध्यक्ष सुनिल जाधव व कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.          

            लगोरी,विटी दांडू,आटयापट्या,सापशिडी, आंधळीकोशिंबीर,लंगडी,भिंगरी,भिरभिरे,दोरी उड्या,क्रिकेट,भवरा,जीबली,काचाकवड्या,आईचे पत्र हरवले,भातुकली,बादलीत बॉल टाकणे,मातीची भांडी तयार करणे असे अनेक खेळ खेळून बालदिनी आनंदाची लयलूट केली.विद्यार्थ्यानी छोटा भीम,बाल गणेश,चुटकी,राजू,मोटु पतलु,डोरेमॉन अशी विविध कार्टून चित्रे काढून रंगवली.विद्यालयातील सर्व  शिक्षकांनी या अभिनव उपक्रमाचे नियोजन केले.

To Top