Sanvad News दुधोंडी येथील भाग्यश्री जमदाडे सेट उत्तीर्ण

दुधोंडी येथील भाग्यश्री जमदाडे सेट उत्तीर्ण

जून २०१९ मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षेत ( सेट) फिजिक्स या विषयामध्ये दुधोंडी ता. पलूस येथील कु. भाग्यश्री प्रल्हाद जमदाडे यांनी यश संपादन केले आहे.
 त्यांनी आपले शिक्षण बी.एस्सी. रामानंदनगर महाविद्यालयात तर एम.एस्सी.  सांगलीच्या श्रीमती  कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातून पुर्ण केले.
एम. एस्सी नंतर हैदराबाद येथील यु. व्ही. फिजिक्स अकॅडमीच्या प्रा. नागेश राव यांच्या मार्गदर्शनाखाली जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले.  यासाठी तिला प्रा. सारिका औटे, प्रा. संतोष राडे यांचे मार्गदर्शन लाभले.
To Top