भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे विविध कार्यक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेतील शिक्षिका अर्चना येसुगडे यांनी "बालदिनाविषयी"विद्यार्थ्यांना महिती सांगितली.इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक वेशभूषेत येऊन संवादांचे सादरीकरण केले.अवनी वाळवेकर,बाशल शेख,शुभ्रा चौगुले,आयुती मगदूम,आर्यन येसुगडे,वेदिका कणसे,डिंपल रामचंद्रे,अवनी ऐतवडे,स्नेहा माने,रिया कणसे,अवनी गुरव,नेहा मोरे,तृप्ती जाधव,शौर्य मगदूम,चिन्मय तोरस्कर,तनिष्का मगदूम,आदिती वावरे,श्रावणी वसगडे,श्रुती मद्वाण्णा या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती भोसले यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,छाया गायकवाड,संध्याराणी भिंगारदिवे,संजय पाटील,शरद जाधव,विठ्ठल खुटाण,वैशाली कोळी,पूजा गुरव,वर्षा काटे,पूजा मोरे,सफूरा पठाण,रोहित काटकर आदी उपस्थित होते.