भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
गुरुवार दि.१४/११/२०१९ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मुलांना त्यांच्या बद्दल माहिती दिली. यावेळी ज्युनियर के.जी. मधील कु. अनंती मगदुम ही ने चाचा नेहरु यांची माहिती सांगितली. मुलांच्या मनोरंजनासाठी सर्व शिक्षकांनी एक छोटी नाटिका 'शाळा- शाळा' मुलांसमोर सादर केली व ती मुलांना आपलीशी वाटल्यामुळे त्यांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. खास मुलांसाठी संगीत खुर्ची चे आयोजन केले व ते खेळताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह व्दिगुणित झाला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता माने, सर्व शिक्षक व सेवक वर्ग उपस्थित होते.