
भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मध्ये शिकणाऱ्या व विविध क्रीडा स्पर्धेत उज्वल यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बुलढाणा येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कुडो स्पर्धेत कु.श्रुती शशिकांत पाटील इ.७ वी.हिने प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त केले.श्रुती पाटील हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच चि.संस्कार विजयकुमार माने इयत्ता८वी याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त जे.बी.चौगुले यांच्या हस्ते व संचालक डाॅ.सुनिल वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक डी.के.किणीकर,व्यंकोजी जाधव,संजय कदम, जयंत केळकर,संस्थेचे सेक्रटरी एस.एन.कुलकर्णी,विभाग प्रमुख के.डी.पाटील, मानसिंग हाके,पालक डाॅ.शशिकांत पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे,के.जी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता माने उपस्थित होते.पालकांनी प्रशिक्षक दिलावर डांगे व क्रीडा शिक्षक सुनिल ऐतवडे यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.किर्ती चोपडे यांनी तर आभार सौ.उज्वला हजारे यांनी मानले.