सन्मान शिक्षण संस्थेच्या माळवाडी ता.पलूस येथीलआदर्श बालकमंदिर प्राथमिक शाळे मध्ये वार्षिक क्रीडामहोत्सवास प्रारंभ झाला.सन्मान शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक शिरीष चोपडे यांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन करून स्पर्धाना प्रारंभ करण्यात आला.यावेळी सन्मान करिअर अकॅडमी चे प्रमुख प्रशांत जाधव,सन्मान पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सुजाता औताडे,आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.लता पाटील,विकास जंगले,सौ.सविता महिंद आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक माधवी कदम यांनी तर आभार रमेश बारीस यांनी मानले.