Sanvad News खेळ ही आरोग्याची गुरुकिल्ली : डॉ.आदित्यराज घोरपडे

खेळ ही आरोग्याची गुरुकिल्ली : डॉ.आदित्यराज घोरपडे

सांगलीच्या वसंत प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धा.


प्रत्येक विद्यार्थ्याने रोज एक तास मैदानावर खेळले पाहिजे. मोबाईलमुळे मुलांचे आरोग्य बिघडत चालले आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ हीच गुरुकिल्ली असल्याचे मत राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू व राज्य पंच डॉ. आदित्यराज घोरपडे यांनी व्यक्त केले.
       सांगलीतील सांगली शिक्षण संस्थेच्या वसंत प्राथमिक शाळेच्या वर्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉ. घोरपडे यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन, मैदान पूजन करून व श्रीफळ वाढवून झाले. अध्यक्षस्थानी सांगली शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अरविंद मराठे होते. डॉ. घोरपडे म्हणाले, वर्षिक क्रीडा स्पर्धा या खेळाडू निर्माण करण्याचे व्यासपीठ आहेत. या स्पर्धानमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास व संघभावना वाढीस लागते. मुलांनी जंकफूडचा हट्ट न धरता फळे व भाज्या खाल्ल्या पाहिजेत.
        सांगली शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अरविंद मराठे म्हणाले, रोज न चुकता सूर्यनमस्कार घातलाच पाहिजे. स्पर्धा ही गुणवत्ता सिद्ध करण्याचा मार्ग आहे. शाळेचे मुख्याध्यापक राजाराम व्हनखंडे यांनी स्वागत केले. पर्यवेक्षक हेमंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा विभाग प्रमुख प्रमोद हेंबाडे यांनी आभार मानले. यावेळी एनसीसी ऑफिसर नवनाथ लाड, पर्यवेक्षक गजानन कुनूरे यांसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.


To Top