Sanvad News जिजामाता बालक मंदिर आष्टा विद्यालयास संगणक भेट.

जिजामाता बालक मंदिर आष्टा विद्यालयास संगणक भेट.


     बापूसो शिंदे सेवाभावी संस्था आष्टा यांचे तर्फे जिजामाता बालक मंदिर आष्टा या विद्यालयास संगणक भेट देण्यात आला.
       बापूसो शिंदे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संग्राम शिंदे व विक्रम भोपे यांच्या हस्ते संगणक प्रदान करण्यात आला.
बापूसो शिंदे सेवाभावी संस्था ही सर्व सामान्यांसाठी विविध उपक्रम राबविणारी आष्टा शहरातील एकमेव संस्था आहे. असे उदगार मुख्याध्यापिका ज्योती शेटे मॅडम यांनी काढले.
पयावेळी वसंत कांबळे,अशोक मदने,शहाजाम जमादार,प्रसाद देसाई,माजी केंद्रप्रमुख महादेव झांबरे, अशोक कवठेकर, कविवर्य माजी प्राचार्य बाबासाहेब सोलनकर आदींसह पालकवर्ग व शिक्षक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत दत्तात्रय डफळे यांनी तर आभार सौ.मेघा मुळीक यांनी मानले.
To Top