बालदिनानिमित्त कृष्णाकाठ सोशल फौंडेशन भिलवडी यांच्या तर्फे आयोजित सांगली जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.या स्पर्धेतील विजेते स्पर्धक व ते शिकत असलेल्या शाळा पुढीलप्रमाणे..
प्रथम क्रमांक- कु.सानिका दत्तात्रय पाटील.इ.१० वी.
(श्री पार्वती खेमचंद विद्यामंदिर,ताकारी.ता.पलूस जि.सांगली.)
द्वितीय क्रमांक-
कु.यशोदा रामदास रणधीर. इ.१० वी.
(जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला,सांगली.)
तृतीय क्रमांक-
कु.स्वरदा सचिन पाटील इ.९ वी
(यशवंतराव चव्हाण विद्यालय,मौजे डिग्रज. ता.मिरज,जि.सांगली)
उत्तेजनार्थ क्रमांक-
१.खतीजा बाबासाहेब मुलानी.
( जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला,सांगली.)
२.रिजवाना रुस्तम नदाफ.
(जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला,सांगली.)
३.प्रथमेश शेखर माळी.
(सुयश प्राथमिक शाळा,नांद्रे.)
सदर स्पर्धा कृष्णाकाठच्या महापूरबद्दलचे अनुभव विद्यार्थ्यांनी कागदावर उतरावेत व त्यातून लिखाणाची, व्यक्त होण्याची जाणीव प्राप्त व्हावी या उद्देशाने घेण्यात आली होती.या स्पर्धेत शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले. कृष्णाकाठचे जेष्ठ साहित्यिक,सेवानिवृत्त शिक्षक,राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुभाष कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले.
उत्कृष्ट सहभाग :
ओंकार प्रवीण पाटील – नांद्रे
आयीषा नदाफ,सलवा शेख,सुबहाना शेख,शिरीन शेख,तेहरीन बेग,माहेरा पठाण,सानिया विजापुरे,तेजस्विनी कांबळे,नुजहत मुलाणी,मसिरा मुलाणी,नंदिनी माळी,रेशमा मुल्ला,आक्सा शेख,सहाना शेख, तैय्यबा मुजावर,सानिया पटेल,आलीशा हवालदार,आनिसा मुल्ला,महेक मलिक,उमेजा जमादार,सानिया मुल्ला,तनिशा कांबळे, (सांगली).
कोमल पाटील,स्नेहल पाटील, मोनिका सावंत ,शर्वणी साळुंखे,रिया साळुंखे रत्नावली निकम,सानिया लोहार, हर्षाली साळुंखे (तासगाव)
कु.प्रणव आनंद जगताप,कु.गौरव आनंद जगताप. श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल ,जाधववाडी त.फलटण जि-सातारा.
कु.क्षितिजा परशुराम पवार
मु.पो.शिवानी ता.कडेगाव जि .सांगली (BA- III )
सदर स्पर्धे करिता जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला,सांगली.च्या शिक्षिका सौ.विद्या चौगुले,जि.प.शाळा निंबळक चे शिक्षक श्री.रवींद्र माने यांचे विशेष सहकार्य लाभले.
हि स्पर्धा यशस्वी करण्याकरिता कृष्णाकाठ फौंडेशनचे अध्यक्ष अमोल वंडे,उपाध्यक्ष-दत्ता उतळे ,सचिव-केतन मोरे,संस्थेचे संचालक शरद जाधव यांच्यासह सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.
सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरणासंदर्भात माहिती लवकरच विजेत्यांना यथावकाश कळविली जाणार आहे.