Sanvad News खाजगी मराठी प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा.

खाजगी मराठी प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा.

               भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे विविध कार्यक्रमांनी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या हस्ते संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील सहाय्यक शिक्षक शरद जाधव यांनी "संविधान दिनानाविषयी"विद्यार्थ्यांना महिती सांगितली.संध्याराणी भिंगारदिवे संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले.
             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती भोसले यांनी केले.संविधान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य व संविधान प्रास्ताविकेचे लेखन केले.यावेळी मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,छाया गायकवाड,संजय पाटील,विठ्ठल खुटाण,वैशाली कोळी,अर्चना येसुगडे,वर्षा काटे,पूजा मोरे,सफूरा पठाण,रोहित काटकर आदी उपस्थित होते.
To Top