भिलवडी-सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संविधान दिवस उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. तनया विजय चौगुले हिने संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले व विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले. तसेच २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यालयातील जेष्ठ शिक्षक मा.रुपेश कर्पे सर यांनी संविधान दिनाचे महत्व सांगितले.निलेश कुडाळकर सर यांनी सूत्रसंचालन तर फलकलेखन सुनील भोये यांनी केले. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख एस. एस.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस.एम.मन्वाचार, उपमुख्याध्यापक एस.एन.कुलकर्णी,पर्यवेक्षक एस.एल. माने सर ,सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.