पलूस येथील श्रीमंत लालासाहेब इनामदार विदयालयामध्ये संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक बाळासाहेब कटारे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले.
सागर तावरे यांनी संविधानाबद्दल व नागरिकांची मूलभूत कर्तव्य या बद्दलची माहिती दिली.
विद्यार्थांच्या वकृत्व स्पर्धा ही घेण्यात आल्या. या मध्ये इयत्ता १ली ते४थी पर्यंतच्या विदयार्थांनी सहभाग घेतला कु. मानसी सुर्यवंशी, कु. श्रावणी पाटील, अवधुत पवार, श्रवण सुतार, प्रणाली शितापे, साद मुल्ला, हर्षवधन मोरे, बीना धामी अशा अनेक विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सौ. सारिका पाटील मॅडम यांनी संविधान गीत विद्यार्थ्यांना ऐकवले.
शेवटी संविधानाचं सामुदायिक वाचन करण्यात आले.
आभार प्रशांत राठोड यांनी मानले.