Sanvad News भिलवडीच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..

भिलवडीच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..


जुन्या आठवणीत रमले माजी विद्यार्थी...


         भिलवडी ता.पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये सन २०१४ मध्ये बी.ए.भाग १,२,३ च्या वर्गात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचा विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीती मध्ये व भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
              बाबासाहेब चितळे महाविद्यालय हे आदर्श माणूस घडविणारे विद्यापीठ आहे.त्यामुळे आम्ही घडलो,महाविद्यालयाशी असणारे नाते आम्ही आयुष्यभर जपूण ठेवू अशा शब्दात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
              पुणे जिल्हा आदर्श शिक्षक प्राप्त झालेबद्दल माजी विद्यार्थी हसन शिकलगार यांचा विश्वास चितळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
           यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे,जे.बी.चौगुले,डी.के.किणीकर,आर.डी.पाटील,संजय कदम,माजी प्राचार्य डॉ.पी.बी.कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीकांत चव्हाण,प्रा.एस.डी.कदम यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व माजी विदयार्थीनी व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दता कोळी यांनी तर
आभार अर्चना जरंडे यांनी मानले.या स्नेहमेळाव्याचे संयोजन सुधीर माळी,हसन शिकलगार,अविनाश निकम, हमीद डिग्रजे,धनचंद्र खोत, पद्मिनी चौगुले,मनीषा मगदूम,दिलीप पाटील आदींनी केले.

To Top