Sanvad News खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या सांगली जिल्हा कार्यकारणीची निवड जाहीर..

खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या सांगली जिल्हा कार्यकारणीची निवड जाहीर..

अध्यक्षपदी बाळासाहेब कटारे,तर कार्याध्यक्षपदी राजाराम व्हनखंडे यांची निवड..

       महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या सांगली जिल्हा कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली.शिक्षक आमदार मा.भगवान आप्पा साळुंखे व पुणे विभागाचे अध्यक्ष मा.राजेंद्र नागरगोजे व स्थायी निवड समितीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सांगलीची  कार्यंकारणी निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हा कार्यकारणीवर निवडी झालेले  पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.
         सल्लागार-चंद्रकांत चव्हाण (दादा ),मार्गदर्शक व नेते- अरविंद पाटील सर,आर.बी.पाटील(साहेब),
 सांगली जिल्हा अध्यक्ष-बाळासाहेब कटारे,
 सांगली जिल्हा कार्याध्यक्ष-राजाराम व्हनखंडे,
सांगली जिल्हा कार्यवाह तथा सचिव -संतोष जाधव,
सांगली जिल्हा उपाध्यक्ष- नितेंद्र जाधव,बाळासाहेब बुरुटे,
 सांगली जिल्हा कार्यालयीण चिटणीस- प्रविणकुमार खोत,
 सांगली जिल्हा कोषाध्यक्ष - प्रविण देसाई,
 सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख- शरद जाधव,
 सांगली जिल्हा संघटनमंत्री-विजय काटकर,
 जिल्हा प्रवक्ते- उदयसिंह भोसले, मुख्याध्यापक सेलचे अध्यक्ष - युवराज साठे,
 जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा- संगिता पाटील, महिला आघाडी उपाध्यक्षा -अनघा पोंक्षे यांची निवड करण्यात आली आहे.
"सांगली जिल्ह्यातील शिक्षकांच्या न्याय व हक्कांसासाठी आपण विविध आघाड्यावर लढत राहणार असून सर्व पदाधिकारी व शिक्षकांना विश्वासात घेऊन कार्यकारणीचे कामकाज करू", अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी मनोगत व्यक्त करताना दिली. या निवडी बद्द्ल सर्व पदाधिकारी वर्गांचे खाजगी प्राथमिक शिक्षक वर्गातून अभिनंदन होत आहे.

To Top