सुभाष दादा पाटील यांच्या स्मृतिदिना निमित्त सेकंडरी स्कूल भिलवडी येथे व्याख्यान.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ उद्योगपती काकासाहेब चितळे होते.यापुढे बोलतांना प्राचार्य पाटणे म्हणाले की,सुंदर जगण्यासाठी चांगल्या संगतीत या,संस्कार खूप महत्त्वाचे आहेत त्यांचे जतन करा, भरपूर वाचन करा.स्वतः साठी नाही तर दुस-यांसाठी जगत राहिला तर जीवनातून हरवत चाललेला उत्कट आनंद प्राप्त होत राहील.संस्थेचे संचालक प्रा.धनंजय पाटील यांच्यावतीने या व्याखानाचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. सुभाषदादा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत प्रा.धनंजय पाटील यांनी,पाहुणे परिचय संजय मोरे यांनी,सूत्रसंचालन के.डी.पाटील यांनी तर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस.एम.मन्वाचार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे,संचालक गिरीश चितळे,डी.के.किणीकर, जयंत केळकर,सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक मोहन पाटील,पर्यवेक्षक संभाजी माने, इंग्लिश मेडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.