Sanvad News क्लेरमाँन्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टा येथे कलाकृतींचे प्रदर्शन.

क्लेरमाँन्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टा येथे कलाकृतींचे प्रदर्शन.


                        क्लेरमाँन्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टा येथे 'Re Aline with Nature' या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.त्यास विद्यार्थी ,पालक,व कलाप्रेमींनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला.

क्लेरमाँन्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टा मधील आर्ट गॅलरीत भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ चित्रकार विलास भड यांच्या हस्ते करण्यात आले.
चित्र म्हणजे स्वतःला शोधणे, हा शोध कधीच संपत नाही, मात्र या प्रवासात कलाकार समृद्ध होत जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार विलास भड यांनी केले.
त्यांनी आपल्या चित्र रेखाटनाचा प्रवास यावेळी उपस्थितांसमोर व्यक्त केला.
                     विद्यार्थ्यांची चित्रे उत्तम झाली आहेत, असे सांगताना मुख्याध्यापक संतोष बैरागी यांनी' शिक्षणाच्या चक्रात आपण स्वतःला विसरतो' असे मनोगत व्यक्त केले.
या उद्घाटनप्रसंगी 'कलेतून प्रत्येकाला मिळणारी अनुभूती ही वेगळी असते असे प्रतिपादन स्कूल ट्रस्टी सौ.सोकोशे मॅडम यांनी केले.
                 विद्यार्थ्यांनी कलाकारांनी अमूर्त,व्यक्तिचित्र,वास्तववादी चित्रांमधून कलाकारांनी उपस्थितांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
कलाप्रेमी आहात? तर मग हा 'Re Aline with Nature' आर्ट शो नक्की पहायला हवा होता !!अशी अनुभूती उपस्थितांनी घेतली.
 



To Top