विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळा बुधगाव येथे वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ करण्यात आला . रूपाली आनंदराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.बी.एम. पाटील, उपाध्यक्ष मा.एच डी जाधव, संचालक अकबर तांबोळी, आदर्श क्रीडा संघटक विष्णू वसवाडे,क्रीडा शिक्षक अनिल उमराणी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.शैलजा पाटील यांनी तर आभार शंकर म्हारगुडे यांनी मानले.विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात
आपला सहभाग नोंदविला.