Sanvad News आदर्श शिक्षण मंदिर किल्लाभाग मिरज शाळेत जागतिक दिव्यांग दिन

आदर्श शिक्षण मंदिर किल्लाभाग मिरज शाळेत जागतिक दिव्यांग दिन


        
   आदर्श शिक्षण मंदिर किल्ला भाग मिरज या शाळेत जागतिक दिव्यांग दिन अंध व्यक्तीच्यां हस्ते व समवेत  साजरा करण्यात आला व समावेशित शिक्षण जागरुकता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी अंध व्यक्ती मा.यशवंत जाधव,जि.प.माध्यमिक विभाग सांगली,मा.प्रविण पाखरे ,स्वरगंधार सांस्कृतिक मंच संस्था,मा.अब्दुल पठाण,मा.दावल शेख अंध अपंग सेवा संस्था चालक,जुनेद बेलिफ, मकरंद पारवे ,उत्तम गायक या सर्व अंध व्यक्ती उपस्थित होत्या.या सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.कल्पना मोहिते मॅडम यांनी केले.या सर्व अंध व्यक्ती यांच्या हस्ते शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा  पुष्प देऊन  सत्कार करण्यात आला.तसेच मा.प्रविण पाखरे यांनी अंध अपंग.व्यक्तीबद्दल ,ब्रेल लिपी ,हेलन केलर यांच्या बद्दल अतिशय उत्तम  शैलीत मार्गदर्शन केले व सुंदर गीत सादर केले,मकरंद पारवे यांनी 'देवाक काळजी ,रे देवाक काळजी,' हे गीत सादर केले व सर्व विद्यार्थ्यांना ठेका धरायला लावला.यावेळी सर्व अंध व्यक्तीनी क्रिकेट खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखविले, या सर्व अंध व्यक्तिचें आभार संभाजी भोसले सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्नेहलता कुरणे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमासाठी श्रीमती माया परांजपे मॅडम,सौ.माधवी दिवाण,सौ.प्राची जोशी,सौ.विनीता आजगावकर,सौ नंदिनी काटकर,श्री उदयसिंग भोसले सर,श्रीमती सुलक्षणा मुळे, सौ.स्वाती कोरे ,सौ.योगिता दंडवते मॅडम सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता.
x
To Top