क्षितिज स्कूल बुरुंगवाडी,ता.पलूस येथे क्रीडा स्पर्धाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव व संस्थेच्या कार्यवाह सौ.वनिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना सुनिल जाधव म्हणाले की,खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक वृत्ती वाढून मन,मेंदू,बळकट होतो.ज्याचे शरीर सदृढ त्याचे मन प्रसन्न असते. सौ.वनिता जाधव यांनी स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक व स्वागत क्रीडाविभाग प्रमुख अंजली चव्हाण यांनी,सूत्रसंचालन अश्विनी झेंडे यांनी,तर आभार करिश्मा संदे यांनी मानले.निशांत कोळेकर यांनी विद्यासर्थ्यांना क्रीडा शपथ दिली.
यावेळी मुख्याध्यापिका दिपाली जाधव,प्राचार्या स्वाती पाटील उपस्थित होते. कबड्डी ,खोखो,लंगडी,रस्सी खेच,रिले ,क्रिकेट असे सांघिक खेल व लिंबू चमचा,२०० मी,४०० मी धावणे,लांब उडी,गोळा फेक,सॅक रेस असे वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन संकुलातील सर्व शिक्षक व क्रीडा शिक्षकांनी आयोजन केले.