Sanvad News श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालयात क्रीडा स्पर्धांना प्रारंभ..

श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालयात क्रीडा स्पर्धांना प्रारंभ..


            सन्मान शिक्षण संस्थेच्या श्रीमंत लालासाहेब इनामदार विदयालय पलूस येथे वार्षिक क्रीडा स्पर्धाना प्रारंभ करण्यात आला.पलूस केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती सुवर्णा कोळी मॅडम यांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा व मैदानाचे पूजन करून क्रीडा स्पर्धाना प्रारंभ केला.
                प्रमुख पाहुण्या सुवर्णा कोळी यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब कटारे यांनी गुलाबपुष्प सत्कार केला.विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुवर्णा कोळी म्हणाल्या की, खेळातून सांघीक भावना वाढते, शरीर तंदुरुस्त राहते,मन प्रसन्न राहते,सहकार्याची भावना विदयार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होते.
               क्रीडा प्रकारामध्ये सांघिक व वैयक्तीक असे खेळ घेण्यात येणार आहेत.प्रास्ताविक सागर तावरे यांनी केले. आभार क्रीडा प्रमूख यांनी मानले.यावेळी सारिका पाटील, प्रशांत राठोड, सागर तावरे, जगन्नाथ फाळके,विजयकुमार फल्ले,बालवाडी विभागप्रमूख श्रीमती रंजना फाळके,ज्योती तुपे,यांच्यासह पालक उपस्थित होते.


To Top