Sanvad News भिलवडी इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये सेव्हन सिस्टर्स प्रोग्रॅम..

भिलवडी इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये सेव्हन सिस्टर्स प्रोग्रॅम..


          भिलवडी शिक्षण संस्थेच्या भिलवडी ता. पलूस येथील इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये सेव्हन सिस्टर्स हा विविधतेतून राष्ट्रीय एकात्मता दर्शविणारा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविला.त्यांस विद्यार्थी,पालक वर्गातून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
               शाळेतील इ.६वी च्या विध्यार्थ्यींनी पाठ्यपुस्तका तील पाठावर आधारित भारतातील ७ राज्यांविषयी सखोल माहिती मिळण्यासाठी 'सेव्हन सिस्टर्स ' चे आयोजन केले.आसाम,अरूणाचलप्रदेश, मिझोराम,मणिपूर मेघालय,त्रिपुरा,आणि नागालँड या सात राज्याची वनस्पती,पोषाख,खाद्यपदार्थ, प्राणी, आदींची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक राज्यांचा पारंपारिक पोषाख परीधान केलेला.सहा-सात विद्यार्थी असे गट बनवून संबंधित प्रदेशातले सर्व खाद्य पदार्थ बनवण्यात आले.उपस्थित मान्यवर व सर्व शिक्षकांनी सात राज्यातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.शालेय शिक्षणा बरोबर वैविध्यपूर्ण उपक्रम राबिवणाऱ्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलच्या या उपक्रमातून भारतातील'विविधते मध्ये असणारी एकता' उपस्थितांना अनुभवायला मिळाली.
                 या कार्यक्रमासाठी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीष चितळे,सचिव एस.एन.कुलकर्णी,विभाग प्रमुख के.डी.पाटील,मानसिंग हाके,के.जी.विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता माने,प्रायमरीच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे आदी उपस्थित होते.
या उपक्रमाचे नियोजन शिक्षिका सिमा पाटील यांनी केले.

To Top