Sanvad News पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली रायरेश्वरावर शपथ; प्रदूषण मुक्त भारताचा घुमला नारा.

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली रायरेश्वरावर शपथ; प्रदूषण मुक्त भारताचा घुमला नारा.


पलूस येथील  येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयाचा अभ्यास दौरा तळबीड चाफळ वाई रायरेश्वर येथे गेलेला होता तळबीड येथील सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती घेतली चाफळ येथील राम मंदिर वाई येथील महागणपती यांचे दर्शन घेऊन करून सर्व विद्यार्थी  रायरेश्वर या किल्ल्यावर गेले १७ एप्रिल  १६४५ रोजी  याच रायरेश्वराच्या साक्षीने शिवाजी महाराजांनी निवडक सहकाऱ्यांसमवेत  स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती .त्याच रायरेश्वराच्या साक्षीने विदयालयातील  विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रदूषणमुक्त भारत बनवण्याची व  पर्यावरण संवर्धन करण्याची तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्याची शपथ घेतली. ही शपथ इतिहास शिक्षक बाळासाहेब चोपडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली .विदयालयाचे मुख्याध्यापक श्री टी जे करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौराचे आयोजन केले होते. अभ्यास दौऱ्यात सहल प्रमुख मिलिंद शिरतोडे सुनील सावंत विकास गुरव ए.जे.  सावंत गजानन पाटील एस.डी.सावंत व शिक्षक सहभागी झाले होते .संस्थेचे अध्यक्ष श्री उदय परांजपे साहेब सचिव शहा साहेब ऊपाध्यक्ष सुनील रावळ तात्या संचालक विश्वास रावळ भाऊ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


To Top