भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अॕण्ड ज्युनि. काॕलेज , भिलवडी येथे राष्ट्रीय स्तरावरील आॕलिम्पीयाड परीक्षा संपन्न झाली. भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयासाठी इ.११वी व १२वी शास्त्रच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन (IAPT) इंडियन असोसिएशन आॕफ फिजीक्स टीचर्स व होमी भाभा सेंटर फाॕर एज्युकेशन आॕफ रिसर्च , मुंबई यांच्या वतीने दरवर्षी केले जाते..सन १९९७ पासून सेकंडरी स्कूल अॕण्ड ज्युनि .काॕलेज , भिलवडी हे एक मान्यताप्राप्त देशपातळीवरील केंद्र आहे. चालू वर्षी भिलवडी, आष्टा, कवलापूर, बेळंकी, कराड, रामानंदनगर व ऐतवडे बुद्रुक येथील ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेचे नियोजन प्रा. जी. बी. पाटील तसेच उच्च माध्यमिकच्या शास्त्र शाखेच्या शिक्षकांनी केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एम. मन्वाचार याच्या मार्गदर्शनानुसार परीक्षा संपन्न झाली.